खासदार शरद पवारांची तोफ आज फलटणमध्ये धडाडणार; पक्ष प्रवेश व जाहीर सभेचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 14 ऑक्टोबर 2024 | फलटण | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये व जाहीर सभा अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन आज सोमवार दि. १४ रोजी दुपारी ३.३० वाजता अनंत मंगल कार्यालय, कोळकी (फलटण) येथे करण्यात येत आहे. आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघासह सातारा जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आज सोमवार दि. १४ रोजी दुपारी ३.३० वाजता अनंत मंगल कार्यालय, कोळकी फलटण येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.

या कार्यक्रमास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह फलटण, माण, खटाव, खंडाळा वगैरे सर्व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहुन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश करणार आहेत.

यावेळी खा. शरद पवार यांच्यासह उपस्थित मान्यवरांची सद्य राजकीय स्थिती, आगामी विधानसभा निवडणुका वगैरे विविध विषयांवर मार्गदर्शनपर भाषणे होणार आहेत, तरी शेतकरी, उद्योजक, महिला, तरुण वर्ग वगैरे विविध समाज घटकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!