दैनिक स्थैर्य | दि. २७ फेब्रुवारी २०२३ | फलटण | पूर्वीच्या सातारा व आताच्या माढा लोकसभा मतदारसांघातील फलटण तालुका हा कायमच राजकीय दृष्ट्या वलय असलेला तालुका आहे. फलटण तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघात विकासाचा धडाका हा खासदार रणजितसिंह यांनी लावला आहे. त्यामुळे त्यांची संपूर्ण राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये एक विकासपुरुष म्हणून ओळख निर्माण झाली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार म्हणून निवडून गेल्यापासून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा फलटण तालुका म्हणून आता ओळख प्राप्त झाली आहे. आमचे नेते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे कि, मला कोणत्याही आरोप – प्रत्यारोपामध्ये पडायचे नाही. तालुक्याचा सर्वांगीण विकास करूनच कृतीतूनच उत्तर द्यायचे आहे. त्यामुळे कुणीही कितीही आरोप केले तरी जनता अश्या भूलथापांना आता बळी पडणार नाही, असे मत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे व फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.
गत दोन वर्षांपूर्वी कोविड 19 मूळे अनेक विकासकामे करताना मर्यादा आल्या होत्या. त्याचे कारण म्हणजे लोकांचे जीव वाचवण्यासाठी केंद्रातून निधी पाहिजे एवढा उपलब्ध होत नव्हता; तसेच राज्यात भाजपचे सरकार नसल्याने मुद्दामून निधी दिला गेला नाही. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असून शेतीला पाणी, आरोग्यसेवा, रस्ते, रेल्वे, नाईकबोमवाडी एमआयडीसी व इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे अहोरात्र झटत असून त्यांच्या कामाने फलटण तालुक्यातील जनतेला नवीन आशेचा किरण दिसत आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला, जमिनी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचा, पुनर्वसन फलटण तालुक्यात, निधी सातारा जिल्ह्याचा आणि ते पाणी मात्र इतरांना अशी अवस्था झाली होती, कालवे पूर्ण होऊ नयेत म्हणून राजकीय व शासकीय कागदी घोडे नाचवून फलटणच्या जनतेला व शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम तब्बल 20/25 वर्षे सातत्याने सुरू होते. काही काळ अपवाद वगळता फलटणच्या जनतेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन लागला होता, असे मत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे व फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी स्पष्ट केले.
ना.देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री होताच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांची शेतीच्या पाण्यासाठी वणवण बघितली जात नव्हती. खासदार रणजितसिंह हे राज्य सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा करीत होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि नीरा देवधर प्रकल्पाला सुधारित मान्यता मिळून भरघोस असा निधी उपलब्ध झाला आहे, , असे मत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे व फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील युवकांना तालुक्यातच नोकरी मिळाली पाहिजे यासाठी जुनीच मागणी असलेल्या नाईकबोमवाडी एमआयडीसीचे स्वप्न सत्यात उतरवले आणि त्या मध्ये तब्बल विसहून अधिक आंतराष्ट्रीय कंपन्या तिथे येणार असून फलटण तालुक्यातील हजारो युवकांना त्यामध्ये रोजगार उपलब्ध होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ग्रामीण भागातील व शहरी भागातील लोकांसाठी रुग्णालय असणं गरजेचं होतं म्हणून राज्य शासनाकडे पाठपुरावा करून 65 कोटी रुपये मंजूर करून घेतले व लवकरच त्याचा आराखडा होऊन कामाला सुरुवात होईल. आळंदी पंढरपूर महामार्ग मंजूर झाल्यामुळे अनेक वारकरी या रोडने पंढरपूरकडे जात असतात. या वारकऱ्यांसाठी फलटण तालुक्यामध्ये दोन वारकरी भवन मंजूर झाले असुन लवकरच कामाला सुरुवात होईल, असे मत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे व फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी स्पष्ट केले.