
दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑक्टोबर २०२१ । फलटण । माजी खासदार लोकनेते स्व. हिंदुराव नाईक-निंबाळकर हे फलटण शहरांमधील मुस्लिम बांधवांना दिवाळी निमित्त फराळ वाटपाचे आयोजन गेल्या बऱ्याच वर्षांपासून करत होते. परंपरा खंडित होऊ नये म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुद्धा फलटण शहरामधील सर्व मुस्लिम बांधवांना दिवाळीनिमित्त फराळ वाटपाचे आयोजन केलेले आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण शहरांमधील सर्व मुस्लीम बांधवांच्या घरोघरी जाऊन फराळाचे वाटप करण्यात येत आहे.