स्थैर्य, फलटण, दि. १० : मंगळवेढा – पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूक नुकतीच संपन्न झाली. या मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय झाला. मंगळवेढा – पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराची जबाबदारी हि पक्षाने माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर सोपिवली होती. पक्षाने दिलेली जबाबदारी हि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पूर्णत्वास नेहून मंगळवेढा – पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांना निवडून आणले. आवताडे यांच्या विजयामध्ये यशामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेच अथक परिश्रम आहेत. आगामी काळामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या कार्याची पक्ष दखल घेईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुंबई येथे मंगळवेढा – पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांचा सत्कार माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्कार केला. त्या वेळी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस बोलत होते. या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी मंत्री बाळा भाऊ भेगडे, आमदार प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते – पाटील आमदार, जयकुमार गोरे, सचिन शेट्टी, आमदार राम सातपुते, सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख, किसान मोर्चाचे कोषाध्यक्ष शशिकांत देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आगामी काळामध्ये काम करत असताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पस्तीस गावच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात लवकरच पूर्ण अभ्यास करून या बाबतचा प्रस्ताव दाखल करावा. सध्या मंगळवेढा – पंढरपूर विधानसभा मतदारसंघात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तरी कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी व कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार योग्य प्रक्रारे उपचार होण्यासाठी नियोजन करण्यात यावे, असेही निर्देश माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिले.