खासदार रणजितसिंह अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले; जीव वाचविण्यासाठी केला प्रयत्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ५ मार्च २०२४ | फलटण |
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर फलटण तालुक्यातील सुरवडी गावाजवळील जगताप वस्ती येथे आज दुपारी ४ वाजता स्वीफ्ट गाडी व मोटारसायकल यांची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. याचवेळी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गाडीचा ताफा अपघातस्थळावरून जात असताना त्यांनी आपली गाडी थांबवून जलद गतीने मदतकार्य सुरू केले. रुग्णवाहिका तातडीने बोलावून घेत अपघातग्रस्तांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. खासदारांनी अपघातग्रस्तांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केला.

या अपघातात आसू, ता. फलटण येथील अमीन शेख (वय ४५) व समीना शेख (वय ४४) हे दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाले असून त्यांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने सुविधा हॉस्पिटल, फलटण येथे दाखल केले.

अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी खासदार निंबाळकर यांना जगताप वस्तीवरील अमित जगताप, मयूर जगताप, चेतन जगताप, वैभव जगताप या स्थानिक तरुणांबरोबरच रस्त्यावरून जाणार्‍या प्रवाशांनीही खूप मोलाचे सहकार्य केले.


Back to top button
Don`t copy text!