स्थैर्य, फलटण, दि. १८ : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोव्हीड हेल्थ केअर सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. यामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना उत्तम उपचार देण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बांधील असून येथील उपचार घेत असलेल्या रुग्णांचे मनोबल वाढण्यासाठी येथे कीर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. याचा लाभ सेंटर मधील सर्व रुग्णांनी घेतला व याचा फायदाच होत असल्याचे मत तेथील रुग्णांनी व्यक्त केले, अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक व भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अनुप शहा यांनी दिली.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण येथे भारतीय जनता पार्टीने लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोव्हीड हेल्थ केअर सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना सर्व वैद्यकीय सेवा या मोफत पुरवल्या जात असून येथील रुग्णांचे मनोबल वाढण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन येथे करण्यात येत आहे. कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते व सदरील आयोजित कीर्तनामध्ये सेंटर मधील सर्व रुग्णांनी उपस्थित राहून त्याचा लाभ घेतला व या किर्तनामुळे रुग्णांचे मनोबल वाढण्यामध्ये नक्कीच यश आलेले आहे, असेही नगरसेवक शहा यांनी स्पष्ट केले.
लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोव्हिड हेल्थ केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनसह सर्व वैद्यकीय सुविधा या मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्या रुग्णांना चहा, नाश्ता व जेवण उपलब्ध होत नाही. त्यांना संत निरंकारी बाबा मंडळ व होटेल ब्रम्हा यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येत आहे व येथे राहणाऱ्या रुग्णांना बरोबर मी स्वतः रहात असून रुग्णांना चोवीस तासांमध्ये कसलीही अडचण आली तरीही त्यांच्या सेवेसाठी मी कटिबद्ध आहे असे आश्वासन नगरसेवक अनुप शहा यांनी यावेळी दिले.