
दैनिक स्थैर्य । दि. ०२ मे २०२२ । फलटण । माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावतीने प्रतिवर्षी प्रमाणे फलटण शहरातील व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शिवजयंती व रमजान ईदच्या निमित्ताने तीस हजार लिटर दूधाचे वाटप करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या नंतर सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये व्यवसायामध्ये खूप बदल झालेले आहे. सामान्य माणसांना आपल्या कुटुंबाबरोबर हा सण मोठ्या प्रमाणामध्ये दूध मिळाल्यामुळे साजरा करण्यात येत आहे. त्या कुटुंबामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी बुथ अध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख व प्रमुख कार्यकर्ते प्रत्येक घरामध्ये जाऊन दुधाचे वाटप करत आहेत व परिश्रम घेत आहेत.