एमआयडीसी मधील कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ एप्रिल २०२२ । बारामती ।  बारामती एमआयडीसी मधील विविध कंपनी मधील कामगार संघटना यांच्या वतीने ०८ एप्रिल रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक वरील हल्ल्याच्या निषेधार्थ व ऍड गुणरत्न सदावर्ते व हल्लेखोर यांना कडक शासन करावे या मागणी साठी तालुका पोलीस स्टेशन ला निवेदन देऊन पेन्सील चौक ते भिगवण चौक येथे निषेध रॅली काढण्यात आली. तालुका पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात ग्रीव्ह्ज कॉटन अँड अलाईड कंपनीज, एम्प्लॉएज युनियन पियाजो व्हेईकल प्रा.लि.बारामती, तानाजी खराडे,सचिन चौधर पुना एम्प्लॉईज युनियन, त्रिमूर्ती इ.प्रा.लि.बारामती, भाऊ ठोंबरे, मनोज सावंत,भारतीय कामगार सेना, सुयश ऑटो बारामती भारत जाधव,  पोपट घुले, श्नायबर डायनॅमिक्स डेअरीज एम्प्लॉएज युनियन बारामती नानासो थोरात, गजानन भुजबळ, इमसोफर मॅन्यु एम्प्लॉएज युनियन बारामती नानासो बाबर, अमोल पवार, आयएसएमटी कामगार संघटना बारामती कल्याण कदम, गुरुदेव सरोदे, भारत फोर्ज कामगार संघटना (कॅम) बारामती राहुल बाबर, आनंद भापकर ,बारामती दूधसंघ कामगार कृती संघटना (नंदन डेअरी/पशुखाद्य) राहुल देवकाते, प्रकाश काटे, बारामती तालुका अंगणवाडी सेविका, आशाताई शेख यांच्या सह्या आहेत.

या वेळी कामगार सेनेचे भारत जाधव,व नाना थोरात,राहुल बाबर,रमेश बाबर,खंडू गायकवाड,गुरुदेव सरोदे,तानाजी खराडे व टेक्स्टाईल पार्क मधील विविध युनिट मधील महिलांनी नि मनोगत व्यक्त केले तुकाराम चौधर यांनी सूत्रसंचालन केले.


Back to top button
Don`t copy text!