स्थैर्य, सातारा, दि. 01 : 30 हजार लिटर दूध पावडचा बफर स्टॉक करावा, दूध पावडर, तूप, बटर यासारख्या दुग्धजन्य पदार्थ वरचा जीएसटी पूर्णपणे रद्द करावा आणि पुढील तीन महिन्यांसाठी राज्य सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा करावी. या मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात शनिवारपासून दूध आंदोलन सुरू केले.
शिवथर, ता. सातारा येथे दुधाने अंघोळ करीत आंदोलन केलं. या आंदोलनात दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.
दूध आंदोलनाला रयत क्रांती युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जाधव सातारा तालुका अध्यक्ष संजय साबळे तानाजी साबळे मारुती साबळे राजेंद्र साबळे प्रमोद जाधव कार्यकर्ते उपस्थित होते.