मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंदसातारा शहर पोलिसांची कारवाई ः दहा मोटारसायकली हस्तगत 

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.३: येथील सदर बझार परिसरात सातारा शहर पोलिसांनी दुचाकी चोरी करणार्‍या दोघास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दहा मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. विकास मुरलीधर मुळे रा. मंगळवार पेठ, सातारा असे एकाचे नाव आहे तर त्याच्यासमवेत एक अल्पवयीन युवकासही ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी, दिनांक 2 रोजी सातारा शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरणचे पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी सदरबझार परिसरात दोन इसम संशयीतरित्या दोन मोटरसायकल घेवून थांबले असल्याची खबर पथकाला मिळाली. त्यनुसार पथकाने तत्काळ त्याठिकाणी जावून शोध घेतला असता सदरबझार परीसरातील एका चर्चनजिक दोन संशयीत आढळून आल. पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेल्या मोटारसायकलींच्या कागदपत्रांची मागणी केली असता ते उडवा-उडवीची उत्तरे देवू लागले. त्यांची कसून चौकशी केली असता मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आले. तेथे सखोल चौकशी दरम्यान त्यांनी आणखी 8 मोटारसायकली सातारा, कराड, सांगली व पुणे परीसरातून चोरी केल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी त्या आठही मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

 

या कारवाईत पथकाने दुचाकी चोर टोळी जेरबंद करण्याबरोबरच 10 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. यासंदर्भात दुचाकी चोरीचे सातारा शहर पोलीस ठाण्यात 4, कराड शहर पोलीस ठाण्यात 1 गुन्हा व सांगली येथील 1 गुन्हे दाखल आहेत. इतर मोटारसायकलींबाबत दाखल गुन्हयांची माहिती पोलीस घेत आहेत. 

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक दलाल, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार प्रशांत शेवाळे, गुलाब जाधव, पो.ना. अविनाश चव्हाण, चंद्रकांत भोसले, विजय गायकवाड, पो. कॉ. गणेश घाडगे, पो. कॉ. अभय साबळे, पो. कॉ. संतोष कचरे व पो. कॉ. गणेश भोंग यांनी केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!