दैनिक स्थैर्य | दि. २० जानेवारी २०२५ | फलटण |
फलटण शहरातील लक्ष्मीनगर येथे हॉटेलसमोर पार्किंग केलेली हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेन्डर मोटारसायकल (क्र. एमएच-११-एझेड-२८५०) अंदाजे किंमत ७० हजार रुपये ही अज्ञात चोरट्याने पळविल्याची फिर्याद अभिजीत शिवाजी भोसले (रा. नरसोबानगर, कोळकी, ता. फलटण) शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
या चोरीचा अधिक तपास पोलीस हवालदार पूनम तांबे करत आहेत.