दैनिक स्थैर्य | दि. २६ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण येथील गोविंद दूध डेअरीच्या समोरील रस्त्यावरून २४ डिसेंबर रोजी सुमारे १० हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच४२डब्लू६५४९) ही अज्ञात चोरट्याने पळविल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून याबाबत फिर्याद तोफिक राजू शेख (रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) यांनी दिली आहे.
या चोरीचा अधिक तपास म.पो.ना. हेमा पवार करत आहेत.