
दैनिक स्थैर्य | दि. १६ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
फलटणच्या ब्राह्मण गल्ली येथून १४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ६.०० वाजण्याच्या दरम्यान रॉयल रेसिडेन्सीच्या पार्कींगमधून होंडा कंपनीची मोटारसायकल (क्र.एमएच ११ सीआर ०८४२) अज्ञात चोरट्याने पळविल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात सरस्वती मधुकर काशिद (रा. रॉयल रेसीडेन्सी, दुसरा मजला, फ्लॅट नं. ५, ब्राम्हण गल्ली, फलटण) यांनी दिली आहे.
या चोरीचा तपास पो.हवा. एस. डी. फाळके करत आहेत.