दैनिक स्थैर्य । दि. १५ डिसेंबर २०२१ । माण । थदाळे ता माण येथील रहिवासी व नोकरी निमित्त नाशिक येथील महेंद्रा कंपनीत नोकरी करत असलेले गजानन वावरे व त्यांची आई हिराबाई वावरे हे थदाळे सोसायटीचे मतदान करुन पुन्हा कामावर नाशिक येथे शिंगणापूर भवानी घाटातून जात असताना ४०० फूट खोल दरीत कार कोसळून झालेल्या अपघातात माय लेकरांचा दुरदैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली असुन या घाटातून जाणारे व येणाऱ्यानी मदतीसाठी दरीत उतरले मात्र अपघात येवढा जबरदस्त होता की या अपघातात मायलेकरांचा जागेवरच अंत झाला अधिक तपास दहिवडी पोलीस करत आहेत.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, थदाळे ता. माण या गावात सोसायटीची पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानासाठी थदाळे येथील रहिवासी व नोकरी निमित्त नाशिक येथील महेंद्र कंपनीमध्ये अधिकारी म्हणून काम करत असणारे गजानन सर्जेराव वावरे वय ५८ व आई हिराबाई सर्जेराव वावरे वय ७५ हे दोघे सोमवारी आपल्या गावी सोसायटी मतदानासाठी आले सोमवारी आपले मतदान करुन गावातील लोकांच्या गाठी भेटी घेऊन आज मंगळवारी थदाळे या आपल्या गावातील मंडळींचा निरोप घेऊन वावरहिरे मार्गी शिंगणापूर नातेपुते भवानी घाटातून जात असताना गाडीवरील अचानक ताबा सुटून भवानी घाटातील खोल दरीत जवळ जवळ ४०० फुट खोल दरीत कार कोसळली. या अपघातात माय लेकरांचा दुरदैवी मृत्यू झाला अधिक माहिती समजून शकली नाही दहिवडी पोलीस या अपघाताची करत आहेत.