दैनिक स्थैर्य | दि. १८ सप्टेंबर २०२३ | फलटण |
काळुबाईनगर (मलटण, ता. फलटण) येथे घरी जात असताना दि. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास सासू आपल्या चहाड्या फोनवरून कोणालातरी सांगत आहे, असे वाटून सूनेने आपल्या माहेरच्या माणसांना घेऊन सासूस घरात घुसून मारहाण, दमदाटी व शिवीगाळ केल्याची फिर्याद फलटण शहर पोलिसात दाखल झाली आहे. या प्रकरणी सासू अरुणा कैलास जाधव (वय ५७ रा. काळुबाईनगर, मलटण) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी सून विद्या बबन नाळे (रा. काळुबाईनगर, मलटण, ता.फलटण), बबन आण्णा नाळे (रा. विडणी, ता. फलटण), ज्योती सुनिल शिंदे, सुनिल शिंदे, श्रुती सुनिल शिंदे, श्रेया सुनिल शिंदे (सर्व रा. शुक्रवार पेठ, फलटण) या सहाजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.