पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिरात तीस लाखापेक्षा जास्त मंत्राचे पठण


सातारा : येथील पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिरात जपासाठी सहभागी झालेल्या महिला भाविक.

स्थैर्य, 21 फेब्रुवारी, सातारा : येथील पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर आयोजित .. ऊॅ ऐं ह्रिं क्लीं चामुण्डायै विच्चे नम: .. हा मंत्र 13 लाख वेळा करण्याचा संकल्प करण्यात आला होता, परंतु प्रत्यक्षात हा जप तीस लाखापेक्षा जास्त झाल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. महिला व पुरुष भाविकांच्या उपस्थितीत मंदिरात करण्यात आला.

सुरुवातीला प्रथम मंदिरात दुर्गा मातेच्या मूर्तीला पहाटे साडेचार वाजता सुगंधी द्रव्याचा महाअभिषेक घालण्यात आला. यानंतर पहाटे सहा वाजल्या पासून वरील मंत्राचा महिला भाविकांच्या उपस्थितीत जप करण्यात आला. सकाळच्या सत्रामध्ये वरील जप पठण करण्यासाठी महिला भाविक उपस्थित होत्या. त्यासाठी त्यांना ट्रस्टतर्फे आसन व्यवस्था, जपमाळ, पाण्याची बाटली, खडीसाखर, अल्पोहार ची व्यवस्था करण्यात आली होती.
तसेच सायंकाळी सात नंतर पुरुष भाविकांसाठी वरील जप करण्यासाठी महिला भाविकांप्रमाणेच पुरुष भाविकांसाठी सुद्धा त्याचप्रमाणे व्यवस्था करण्यात आली होती.हा जप पठण करण्यासाठी 1000 पेक्षा जास्त महिला भाविकांनी सहभाग नोंदवला. यात प्रामुख्याने शाहूनगर येथील दुर्गाभक्त, स्वामी समर्थ केंद्र, शनिवार पेठ, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकराचे चैतन्य सदन यांचे विशेष सहकार्य लाभले. सौ. माने यांनी सकाळी 8 वा. सुरु केलेले मंत्राचे पठण रात्री 10 वाजे पर्यत 15 तास बिना पाणी, अन्न न खाता सलग मंत्राचे पठण केले.गुरुवारी सुरू झालेल्या या मंत्र पठण च्या कार्यक्रमात तीस लाखापेक्षा जास्त वरील मंत्राचे पठण झाल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.

या कार्यक्रमासाठी पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख, प्रशांत तुपे, महेश जाधव, दिलीप आफळे, हरीश शेठ, विकी भोसले, ढाणे सर, पोपट भोसले, विशाल शिंदे, अजित सुपेकर, सतीश मुळे, विक्रम चव्हाण, तेजस जाधव, रवी दिवटे, पुष्कर शेलार, हिमांशू निकम, प्रसाद चौधरी व ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!