दैनिक स्थैर्य । दि.३१ जानेवारी २०२२ । सातारा । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात साताऱ्यातील 50हुन अधिक अंगणवाडी सेविकांनी सहभाग नोंदवला ,या कार्यक्रमामध्ये वकील आणि डॉक्टर यांचीही विशेष उपस्थिती होती
माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी दूरदर्शन, आकाशवाणी आणि इतर चॅनल, सोशल मीडिया वरून प्रसारित करण्यात येतो , या साठी सर्वसामान्य नागरिकांच्या कडून विविध विषयांवरील सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून मागवल्या जातात, या सुचनांमधील महत्वाचे विषय निवडून त्याची माहिती आणि महत्व माननीय पंतप्रधान मन की बात मधून विशद करतात, सर्वसामान्य नागरिकांमधील असामान्य व्यक्तिमत्वाबद्दल सुद्धा या कार्यक्रमात उल्लेख करून स्वागत करण्यात येते
सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते , भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आपल्या बूथ वर या कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या बूथ सदस्यांसाहित हा कार्यक्रम पाहत असतात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार , जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली
आज सातारा जिल्ह्यात ८५% बूथ वर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले , सातारा शहरात ११९ बूथ वर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्यातर्फे,भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी दैवज्ञ मंगल कार्यालयात अंगणवाडी सेविकांसाठी विशेष कार्यक्रमात प्रक्षेपणाची व्यवस्था केली होती , राष्ट्राचे भवितव्य घडवणाऱ्या या सेविका , लहान लहान मुलांना प्रशिक्षण देऊन राष्ट्राचा पाया मजबूत करण्याचे काम या सेविका करत असतात , त्यांना सुद्धा महत्व मिळाले पाहिजे या हेतूने त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले , कार्यक्रमानंतर अंगणवाडी सेविकांचे मनोगत जाणून घेण्यात आले , त्यांच्या मागणी नुसार अंगणवाडी सेविकांना उपयुक्त असे ५ इलेक्ट्रिक वजन काटे भारतीय जनता पार्टीतर्फे देण्याचे जिल्हाध्यक्ष विक्रमजी पावसकर यांनी घोषित केले , आणि कोणतीही अडचण आली तर भारतीय जनता पार्टी त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहणार असल्याचे सांगितले.
या वेळी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष ऍड प्रशांत खामकर, जिल्हा उपाध्यक्ष आणि आय टी सेल जिल्हा अध्यक्ष राहुल शिवनामे , वैद्यकीय आघाडीचे जिल्हा अध्यक्ष डॉ उत्कर्ष रेपाळ, अधिवक्ता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष ऍड नितीन शिंगटे, ऍड अनिरुद्ध जोशी, कायदा आघाडी शहर अध्यक्ष ऍड सुरज मोरे, व्यापारी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष डॉ सचिन साळुंखे, वैद्यकीय आघाडी चे शहर अध्यक्ष डॉ वीरेंद्र घड्याळे,डॉ अभिराम पेंढारकर, बेटी बचाओ बेटी पढाओ आघाडी जिल्हा उपाध्यक्ष ऍड सचिन तिरोडकर,सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले ,नगरसेविका सौ प्राची शहाणे, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके,ओ बी सी मोर्च्या युवती जिल्हाध्यक्ष सौ वनिता पवार , सोशल मीडिया शहर अध्यक्ष कृणाल मोरे, जिल्हा विस्तारक स्वप्नील पाटील, सौ घोडके उपस्थित होते