कराड शहरात तब्बल 30 हून अधिक तज्ञ डॉक्टरांना कोरोनाची बाधा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, कराड, दि. ०३ : कराड शहरात कोरोनामुळे स्थिती बिकट होत असतानाच नॉन कोविड रुग्णांचीही स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. नॉन कोविड रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ व गायनाकॉलॉजिस्ट प्रत्येकी 6, फिजिशियन व जनरल प्रॅक्टिशनर्स प्रत्येकी 5, ऑर्थोपेडिक व डेंटिस्ट प्रत्येकी 3, नेत्ररोगतज्ज्ञ व भूलतज्ज्ञ प्रत्येकी 2 डॉक्टर अशा तब्बल 30 हून अधिक तज्ञ डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्याकडे वैद्यकीय सेवा पुरविणार्‍या तब्बल 40 हून अधिक स्टाफही बाधित आहे. त्यामुळे शहरातील 15 हून अधिक नॉन कोविड रुग्णालयांचे कामकाज ठप्प आहे.  कोरोनासह नॉन कोविड रुग्णांवर उपचाराची स्थिती बिकट झाली आहे. उपचार न मिळाल्याने 3 नॉन कोविड नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तीच स्थिती कायम राहिल्यास नॉन कोविड रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर कसे उपलब्ध होणार हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

नॉन कोविड रुग्णांसाठी कार्यरत शहरात ओपीडी व मोठी रुग्णालये सुरू होती. त्यातील डॉक्टरच बाधित ठरू लागल्याने शहरातील लहान-मोठी 15 हून अधिक रुग्णालये बंद आहेत. त्या हॉस्पिटलमधील 40 वैद्यकीय कर्मचार्‍यांचा स्टाफही कोरोनाबाधित झाला आहे. कोरोनाच्या काळात कार्यरत असणार्‍या डॉक्टरांच्या कुटुंबांतील 75 सदस्यही कोरोनाबाधित झाले आहेत.

शहरात कोरोनाची स्थिती अत्यंत भयानक होत असतानाच नॉन कोविड रुग्णांसाठी झटणार्‍या हॉस्पिटलसह त्यांचा स्टाफ व डॉक्टरही कोरोनाबाधित ठरल्याने नॉन कोविड रुग्णांचीही स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. त्यांच्यावर उपचार करणारे शहरातील डॉक्टर कोरोनाबाधित झाल्याने नॉन कोविड रुग्णांचे हाल होत आहेत. शहरातील 15 हून अधिक रुग्णालये आज बंद आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये व ओपीडीत नॉन कोविड रुग्णांवर उपचार करणार्‍या 30 डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात तिघे गंभीर आहेत. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांना उपचारासाठी डॉक्टर व हॉस्पिटलच मिळणे कठीण झाले आहे. नॉन कोविड रुग्णांवरही हॉस्पिटल शोधण्याची वेळ आली आहे. शहरातील दोन मोठ्या हॉस्पिटलसह 15 ओपीडीही बंद आहेत. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांचे हाल होत आहेत. त्यांना उपचार मिळेना, अशी स्थिती आहे. त्यावर उपाय शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. शहरात 25 फिजिशियन आहेत. त्यातील 5 जण कोरोनाबाधित आहेत. शिल्लक फिजिशियन कोविड रुग्णांवरही उपचार करतात. त्यांना तिकडेही लक्ष द्यावे लागते तर अन्य रुग्णांकडेही स्थितीप्रमाणे ते लक्ष देतात. त्यांची स्वतंत्र व्यवस्था आहे.

शहरातील शारदा क्लिनिक कोविडसाठी शासनाने घेतले आहे. तेथील डॉक्टरांसह अन्य स्टाफ कोरोनाबाधित झाला आहे. त्यामुळे कोविडचे ते हॉस्पिटल सध्या बंदच आहे. नॉन कोविड असलेल्या अन्य एका मोठ्या रुग्णालयात डॉक्टरांसह 80 टक्के स्टाफही कोरोनाबाधित आहे. त्यामुळे तेही हॉस्पिटल बंद असल्यासारखेच आहे. जनरल प्रॅक्टिस करणार्‍या डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याने 13 हून अधिक ओपीडी बंद आहेत. त्यामुळे शहरात नॉन कोविड रुग्णांवर उपचारासाठी हॉस्पिटलच शिल्लक नाहीत. कोविडप्रमाणे नॉन कोविड रुग्णालाही हॉस्पिटल शोधण्याची वेळ आली आहे. सोमवार, शुक्रवार व रविवार पेठेतील 3 रुग्ण कोविडचे नसतानाही केवळ नॉन कोविड रुग्णालयात व्हेंटिलेटर व अन्य उपचार न मिळाल्याने दगावले आहेत. हीच स्थिती कायम राहिल्यास नॉन कोविड रुग्णांसाठीही अत्यंत बिकट स्थिती होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील हॉस्पिटल, ओपीडीमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी रेग्युलर तपासणीस येणार्‍यांनी न येण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले होते. नॉन कोविडसाठी शहरातील सुमारे 100 हॉस्पिटलमधून सेवा देण्यात आल्या होत्या. मात्र, नॉन कोविड रुग्ण तपासणारे डॉक्टर व 40 हून अधिक त्यांचा स्टाफ कोरोनाबाधित ठरला आहे. त्यासह डॉक्टरांचे कुटुंबीयही बाधित आहेत. त्यामुळे स्थिती गंभीर आहे. 10 दिवसांचा कडक लॉकाडाउन होण्याची गरज आहे. अन्यथा नॉन कोविड रुग्णांसाठी डॉक्टरच शिल्लक राहणार नाहीत.

डॉ. वैभव चव्हाण, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, कराड.

 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!