स्थैर्य, फलटण, दि. १३ : कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात लसीकरण मोहिम सुरू आहे. कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्यात आज फलटण नगरपरिषदेच्या जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस हि सुरक्षित असून पात्र सर्व नागरिकांनी कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस सरकारी अथवा खाजगी रुग्णालयातून घ्यावी असे आवाहन श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे.
फलटण येथील डॉ. सोनवणे यांच्या हॉस्पिटल मध्ये श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी कोरोनाची लस घेतली.
60 वर्षांपुढच्या नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम 1 मार्चपासून सुरू झाली आहे. ज्यांना इतर काही आजार आहेत अशा 45 च्या पुढच्या नागरिकांनाही या टप्प्यात कोरोनाची लस दिली जाणार आहे. या टप्प्यात 60 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. सोबतच 45 वर्षांवरील पण गंभीर आजार असणाऱ्या लोकांचंही या टप्प्यात लसीकरण दिलं जाणार आहे.
आता सरकारी रुग्णालयांसोबतच काही खाजगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी कोरोनावरील प्रतिबंध लस घ्यावी, असे आवाहन या वेळी श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी केले.