स्थैर्य, कोळकी, दि. ०८ : कोळकी व पंचक्रोशीतील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधातम्क लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
कोळकी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये नुकतेच लसीकरण सुरु करण्यात आलेले आहे. त्या लसीकरण केंद्रास श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार, कोळकीच्या सरपंच सौ. विजया संदीप नाळे, सदस्य अक्षय गायकवाड, सागर काकडे, गणेश शिंदे, गिरवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. आर. एम. जगदाळे, कोळकी उपकेंद्राचे डॉ. ए. एम. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लसीकरणामुळे आतापर्यंत कुणालाही गंभीर स्वरूपाचा त्रास झालेला नाही. लसीकरण मोहीमेच्या सर्व टप्प्यांवर योग्य नियोजन आणि पूर्व तयारी ठेऊन मोहीम यशस्वी करण्याबाबत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी निर्देश दिले.