स्थैर्य, सातारा, दि. 12 : मार्केट कमिटीमध्ये सचिव पदावरील मनवे नामक व्यक्तीला लाचखोरीच्या आरोपात अटक करण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन मार्केट कमिटीच्या सभापती असलेल्या व्यक्तीचा जर नगरसेवक मोने यांनी सातारचा खर्या अर्थाने हित पहाणारे नागरिक म्हणून राजीनामा मागीतला असता तर त्यांना आज माझा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार होता, तथापि आपला तो बाबल्या आणि दुसर्याचे ते कार्ट अशी दुटप्पी भुमिका असलेल्या अशोक मोने यांनी स्वतः त्यांच्या नगरसेवक पदाचा राजीनामा दयावा आणि मग माझे राजीनाम्याबाबत वाच्यता करावी अश्या सडेतोड श्।ब्दात सातारच्या नगराध्यक्षा सौ.माधवी कदम यांनी जेष्ठ नगरसेवक अशोक मोने यांना फटकारले आहे.
याबाबत नगराध्यक्षा सौ.माधवी कदम यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की, वास्तविक एक चांगले व्यक्तीमत्व म्हणून मोने यांना ओळखतो. नगरपरिष्।देच्या कामकाजात आम्ही सर्व नगरसेवक नेहमीच अशोक मोने आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांशी विचारविमर्श करीत असतो. अश्या अशोक मोने यांनी मला गांधारीची उपमा दिली. महाभारतातील गांधारीने तीचा राजा असलेला पती अंध होता म्हणून डोळयावर पटटी बांधली होती. आज माझे पती ना राजा आहेत ना अंध आहेत, त्यामुळे ही उपमा मला लागु होत नाही. त्यांना कदाचित दुसर्यांबाबत बोलायचे असेल पण ते बोलता येत नसेल म्हणून त्यांनी उचलली जीभ लावली टाळयाला असा खटाटोप केल्याचे दिसत आहे.
गांधारीची उपमा मला नाही तर तुम्हालाच लागु होते. सातारकरांच्या हिताचा तुम्हास कध्।ीही न जमलेला विकास श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा विकास आघाडीने केला आहे तो तुम्ही डोळयावर पटटी बांधल्याने दिसत नाही. त्यामुळे गांधारी कोण आहे हे जनतेला वेगळे सांगायची आवश्यकता नाही. शासनाकडून वेगवेगळया योजने संदर्भात आलेला निधी ज्या-त्या योजनांवर रितसरपणे सातारकरांचे लोकहित लक्षात घेवून, विनियोगात आणणेत येत असतो हे मोने यांना माहीती नाही याचे फार मोठे आश्चर्य वाटते. त्यामुळे अशोक मोने यांनी डोळसपणे काही गोष्टी पहाव्यात असे माझे सांगणे आहे.
सातारकरांमध्ये क्लिपा व्हायरल झाल्या आहेत असे मोने सांगत आहेत. मोने यांनी माझेबाबतीत किंवा आमच्या आघाडीच्या बाबतीतील तथाकथित असलेली क्लिप सिध्द करुन दाखवावी आणि मगच याबाबतीत आपले मतप्रदर्शन करावे. कोणाची क्लिप, कोण कोणाची नावे घेतो, याचा प्रत्यक्ष संबंध मोने यांनी जोडून सिध्द करुन दाखवावा. उगाच हवेत गोळ्या मारुन स्वतः हिरो असल्यासारखा बालीशपणा त्यांनी दाखवू नये. सध्या ही बाब न्यायप्रविष्ट होत आहे. त्याबाबत आज वक्तव्य करणे योग्य होणार नाही. आमचा न्याययत्रणा आणि पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. आमचेच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राचे नेते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भ्रष्टाचाराला कधीही खतपाणी घातलेले नाही. किंबहुना ते नेहमीच भ्रष्टाचाराविरुध्द आवाज उठवत आलेले आहेत हे उभ्या महाराष्ट्राला माहीती आहे. त्यामुळे येणार्या काळात कुणाचाही मुलाहिजा न ठेवता भ्रष्टाचाराला थारा दिला जाणार नाही सातारकरांच्या विश्वासाला कदापिही तडा जाणार नाही.,
लाचलुचपत विभागाची धाड पडल्यावर लगेचच दुसर्या दिवशी मी आघाडीची भुमिका विषद केली आहे. तथापि त्याला अशोक मोने हे अनेक दिवसांनी भुमिका मांडली असे म्हणत आहेत. कदाचित वयोमानानुसार त्यांना कालगणनेचे विस्मरण होत असावे.
सातारा विकास आघाडीने आजपर्यंत उदभवलेल्या, नैसर्गिक किंवा कत्रिम संकटांचा सामना मोठया हिकमतीने आणि धीरोदात्तपणे करुन, सातारकरांच्या मुलभूत सेवासुविधांबाबत कुठेही कमतरता जाणवू दिलेली नाही. आमचे नेते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कायमस्वरुपी सातारकरांच्या हिताला प्रथम प्राधान्य दिले आहे. यापुढेही लोकहिताला सर्वोच्य प्राधान्य देवून सातारकरांची सेवा अखंडपणे केली जाईल, असेही नगराध्यक्षा सौ.माधवी कदम यांनी शेवटी नमुद केले आहे.
पत्रकाला पत्रक काढून उत्तर देणे, शब्दछल करणे, माझे विचारात बसत नाही, आक्रस्ताळेपणाने प्रसिध्दीस दिलेल्या अशोक मोने यांच्या किंवा अन्य तथाकथित विरोधकांच्या प्रसिध्दी पत्रकांना उत्तर देणे त्यामुळे प्रशस्त वाटत नाही असेही नगराध्यक्षा सौ.कदम यांनी नमुद केले आहे.