
स्थैर्य, सातारा, दि. 8 डिसेंबर : महिलांवरीलहिंसाचाराला आळा घालण्यासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने इनरव्हील क्लब ऑफ सातारा कॅम्प शाखेच्या वतीने सोमवारी (दि. 8) ऑरेंज द वर्ल्ड कॅम्पेन अंतर्गत नाईट वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. हा वॉकेथॉन रात्री आठ ते 10 या वेळेत होणार आहे.
सोमवारी रात्री आठ वाजता पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातून या वॉकेथॉनची सुरुवात होणार आहे. देवी चौक, सातारा कॅफे व पुन्हा पोवई नाका परिसरात या वॉकेथॉनची सांगता होणार आहे.या उपक्रमातील सहभाग निःशुल्क असून, त्यात सहभागी होणार्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यातील सहभागींसाठी फोटो कॉर्नर देखील ठेवण्यात येणार आहे. या वॉकेथॉनसाठी ऑरेंज कलर हा ड्रेसकोड ठेवण्यात आला आहे.या सामाजिक उपक्रमात शहरातील सर्व सामाजिक संस्था, महिला मंडळे, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी मिनाज मुलाणी, जयश्री शेलार, ऐश्वर्या पाटील, स्नेहा भट्टड व इतर पदाधिकारी सक्रिय आहेत.महिलांची सुरक्षितता आणि सर्वसामान्यांमध्ये त्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा नाईट वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले असून, त्याद्वारे प्रबोधन देखील करण्यात येणार आहे. या वॉकेथॉनमध्ये सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन इनरव्हील क्लब ऑफ सातारा कॅम्पच्या वतीने करण्यात आले आहे.

