
स्थैर्य, फलटण, दि. ३० ऑक्टोबर : श्रीराम सहकारी साखर कारखाना येथे (दि. २८ ऑक्टोबर) आगामी गाळप हंगामाचा पारंपरिक मोळी पूजन सोहळा संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी पूजनाचा पहिला मान कूपर ट्रॅक्टरला देण्यात आला. कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळ, संचालक मंडळ सदस्य व उपस्थितांच्या हस्ते ट्रॅक्टरचे पूजन करण्यात आले. मोळी पूजनानंतर, यंदाच्या गाळप हंगामातील पहिला ऊस कारखान्याकडे वाहून नेण्याचा मान कूपर ट्रॅक्टरला मिळाला.
यानिमित्ताने, कूपर ट्रॅक्टरचे अधिकृत विक्रेते ‘आधार अँड कंपनी’ यांनी कारखान्याचे व्यवस्थापन मंडळ, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वर्गाचे सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.
