महिलेचा विनयभंग; दोघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २४ मे २०२३ | फलटण |
फलटण शहरातील मंगळवार पेठेमधील झिरपे गल्ली येथे गिझर बघण्याच्या उद्देशाने घरात घुसून महिलेचा विनयभंग करून शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा करण्यात आला असून प्रविण हरी चौगुले व पूजा प्रविण चौगुले (दोघेही रा. झिरपेगल्ली, मंगळवार पेठ, फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबतची शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २० मे रोजी सकाऴी ९.३० वाजण्याच्या सुमारास झिरपेगल्ली, मंगळवार पेठ, फलटण येथील पीडित महिलेला ‘वहिनी तुमचा गिझर मला पाहायचा आहे’, असे म्हणून घरात येवून बाथरूममधील गिझर दाखवत असताना प्रवीण चौगुले याने फिर्यादी विवाहीत महिलेला पाठीमागून मिठी मारून उचलून घेतले व माझे मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तसेच पूजा प्रविण चौगुले हिने फिर्यादी महिलेला तसेच त्यांच्या सासू ताराबाई यांना शिवीगाऴ व दमदाटी केली, अशी तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे सपोनि केनेकर करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!