दैनिक स्थैर्य । दि. २५ एप्रिल २०२२ । सातारा । महाविद्यालयातून घरी जात असताना युवतीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना आता समोर आल्यानंतर याप्रकरणी एका युवकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमीन हारून शेख रा. देगाव, ता. सातारा असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत सातारा तालुका पोलिस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, पीडित तरूणी २१ वर्षांची असून, ती कॉलेजवरून घरी जाताना शेख हा पाठलाग करत होता. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. ती नाही म्हटल्यावर तिचा हात पकडून त्याने विनयभंग केला. या प्रकारानंतर संबंधित तरूणीने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याबाबतचा अधिक तपास हवालदार वायदंडे हे तपास करीत आहेत.