मलटण येथे मंडई आणण्यासाठी निघालेले महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २६ एप्रिल २०२३ | फलटण |
मलटण (तालुका फलटण) येथील वेशीच्या पुलाजवळ मंडई आणण्यासाठी निघालेल्या महिलेचा अनिकेत बनसोडे (रा. पाण्याच्या टाकीजवळ, मलटण) याने विनयभंग केल्याची तक्रार फलटण शहर पोलिसात पीडित महिलेने दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, काल दुपारी १२.०० वाजण्याच्या सुमारास मलटण (तालुका फलटण) येथील वेशीच्या पुलाजवळ पीडित महिला मंडई आणण्यासाठी शंकर मार्केट, फलटण येथे जात असताना अनिकेत बनसोडे याने तिचा हात धरून विनयभंग केला. तसेच त्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करत मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, अशी तक्रार महिलेने फलटण शहर पोलिसात दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अनिकेत बनसोडे याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार कदम करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!