सूरज बोडरे व त्याच्या १२ साथीदारांना मोक्का

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १४ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल असणार्‍या फलटण येथील सराईत गुंड सूरज बोडरे व त्याच्या १२ साथीदारांविरुध्द पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

सूरज वसंत बोडरे (वय २३, रा. ५ सर्कल, खामगाव, ता. फलटण), ज्ञानेश्वर उर्फ नन्या वसंत बोडरे (वय २८, रा. पाच सर्कल, खामगाव, ता. फलटण), उमेश संजय खोमणे (वय – २६ वर्ष, रा. गाडगेमहाराज आश्रमशाळेच्या समोर, खराडवाडी), रणजित कैलास भंडलकर (रा. होळरोड, खामगाव), अमर संतोष बोडरे, (रा. पिंपळवाडी, ता. फलटण), सचिन दत्तात्रय मंडले (रा. गणेशनगर, साखरवाडी), तानाजी नाथाबा लोखंडे (वय ३० वर्षे, रा. खामगाव), शरद उर्फ बाबू नंदकुमार पवार (वय २० वर्षे, रा. पाच सर्कल, खामगाव), शंभू आनंदा ननावरे (वय २२ वर्षे, रा. पाच सर्कल, खामगाव), वैभव हणमंत चव्हाण (वय २६ वर्षे), सनी मोहन बोडरे (वय २६ वर्षे), श्रीकांत गुलाब बोडरे (वय ३८ वर्षे, रा. पाच सर्कल खामगाव), गणेश बाळू मदने (वय १८ वर्ष २ महिने, रा. खामगाव) अशी त्यांची नावे आहेत.

टोळी प्रमुख सूरज बोडरे व त्याच्या १२ साथीदारांविरुध्द पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, जबर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नासह दरोडा, जबरी चोरी, अपनयन, जबर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण, शिवीगाळ, दमदाटी, अपहरण, आर्म अ‍ॅक्ट अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल होते. टोळीप्रमुख सूरज बोडरे याने टोळीची दहशत पसरविण्यासाठी फलटण तालुक्यातील इतर गुन्हेगारी टोळीतील सदस्यांना एकत्र केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी टोळीविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित करून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाईकरीता पोलीस अधीक्षक सातारा यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे मोक्काअंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला होता.

या प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनिल फुलारी यांनी मंजुरी दिली आहे. मोक्का कायद्याची कलमे लावून तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, फलटण उपविभाग, फलटण यांच्याकडे देण्यात आला आहे. नोव्हेंबर २०२२ पासून एकूण ४ मोक्का प्रस्तावांमध्ये ४४ जणांना मोक्काअंतर्गत कारवाई फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदारमार्फत करण्यात आली आहे.

मोक्का प्रस्ताव मंजुरीकरीता पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक अरुण देवकर (स्थानिक गुन्हे शाखा), पोनि. धन्यकुमार गोडसे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अमित सपकाळ, संजय राऊत, वैभव सूर्यवंशी, अमोल जगदाळे, अभिजित काशिद, अजय कडेकोट, स्वप्निल खराडे यांनी मोक्का कारवाईकरीता सहभाग घेतला आहे.


Back to top button
Don`t copy text!