दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२१ । फलटण । मोहनराव नाईक निंबाळकर यांनी ग्रामीण भागाच्या आर्थिक उन्नतीसाठी संत ज्ञानेश्वर सहकारी पतसंस्थेची स्थापना करुन या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील असंख्य कुटूंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम केली असल्याचे गौरवोद्गार फलटण येथील माजी पशूप्रांत तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्रीकांत मोहिते यांनी व्यक्त केले.
निंबळक (ता.फलटण) येथील ज्येष्ठ नेते मोहनराव नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना डॉ.श्रीकांत मोहिते बोलत होते.
मोहनराव नाईक निंबाळकर यांच्या घराण्यातील वडीलधारी माणसांची कै.श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर व कै.श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांना एकनिष्ठ साथ लाभली होती. तोच आदर्श पुढे ठेवून मोहनराव नाईक निंबाळकर यांनी ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना साथ दिली आहे. कोरोना काळात कोवीड सेंटर सुरु करुन निंबळक परिसरातील लोकांची आरोग्यसेवा त्यांनी केली. तसेच वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करुन समाजसेवेचे व्रत याही वयात जोपासण्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचेही, डॉ.श्रीकांत मोहिते यांनी सांगितले.
यावेळी डॉ.श्रीकांत मोहिते यांनी मोहनराव नाईक निंबाळकर यांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या.