
स्थैर्य, फलटण, दि. २८ सप्टेंबर : फलटण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर ‘विशेष निमंत्रित संचालक’ पदी भाडळी येथील रहिवासी व मातोश्री विकास सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, मोहनराव साहेबराव डांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही निवड आज, दि. २८ सप्टेंबर रोजी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपक चव्हाण, बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
बाजार समितीचे कामकाज वाढत असून, विविध शासकीय परवान्यांनुसार कामकाजाची व्याप्ती वाढवण्याचे नियोजन आहे. यासाठी प्रत्येक क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा ‘ॲडव्हायझरी पॅनेल’ (Advisory Panel) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर, मोहनराव डांगे यांना समितीच्या कामकाजात सहभागी होऊन मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आल्याचे पत्र चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिले आहे.