दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२२ । नवी दिल्ली । कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा एकदा मोदी सरकार वर निशाना साधाल आहे. राहुल गांधी म्हणाले या सरकार विरूध्द पुन्हा एकदा 1942 सारख आंदोलन करण्याची गरज आहे. राहुल गांधी यांच हे वक्तव्य भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनाच्या मोक्यावर केले. यासोबतच त्यांनी केंद्र सरकार ‘तानाशाह सरकार’ विरोधात करो या मरो या सारख आंदोलन करण्याची सक्त जरूरत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतातील हुकूमशाही सरकारच्या विरोधात आणि देशाच्या रक्षणासाठी आज आणखी एका ‘करो या मरो’ आंदोलनाची गरज आहे, आता अन्यायाविरोधात बोलण्याची वेळ आली आहे, असे राहुल गांधी म्हणाले. हुकूमशाही, महागाई आणि बेरोजगारीमुळे आपल्याला भारतातून बाहेर पडावे लागेल, असेही ते म्हणाले. काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी देशातील बेरोजगारीच्या वाढीशी संबंधित आलेखाचा हवाला देत ट्विट केले की, ‘घर-घर रोजगार, असलियत: हर घर बेरोजगार’.
कॉंग्रेसच्या एकानेत्याने फेसबुक पोस्ट मध्ये म्हणाले की इतिहासाचे त्या पानाला कधीच विसरू शकत नाही. भारत छोडो आंदोलन 8 ऑगस्ट 1942 ला मुंबई मधून सुरू झालेल या आंदोलनाने इंग्रजांची झोप उडवली होती. त्या ऑगस्टच्या संध्याकाळी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर लोक जमू लागले. गांधाजी यांनी ‘करो या मरो’ ची घोषणा दिली. आणि त्याच्या नंतर इंग्रज राजवटीला उतरतीकळा लागली.
राहुल गांधीं म्हणले,आपल्या जीवाची पर्वा न करता लाखो देशवासीयांनी या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात सुमारे 940 लोक शहीद झाले आणि हजारो लोकांना अटक करण्यात आली. ते म्हणाले की, आज भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापनदिनानिमित्त मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहतो.