भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 17 : पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 19 जून रोजी सायंकाळी 5 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे ही बैठक होईल. पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विटद्वारे ही माहिती देण्यात आली.

गलवानच्या खोऱ्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी भारत-चीनच्या सैनिकांमध्ये मोठा वाद झाला. या वादाचे रुपांतर हिंचारात झाले यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले असून काही जण जखमी आहेत. त्यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. हा वाद शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये बैठका आणि चर्चा सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!