दैनिक स्थैर्य | दि. ०१ फेब्रुवारी २०२५ | बारामती | पुण्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान व गोष्टी येत असतात त्या गोष्टी बारामतीमध्ये सुरु व्हाव्यात असे त्यांचे मनापासून इच्छित आहे. अमोल माघाडे व निखिल सोडमिसे यांनी बारामतीमध्ये मॉडर्न किचन सुरु केले आहे, ज्याचे उद्घाटन झाले आहे. मॉडर्न किचनच्या माध्यमातून अत्यंत आधुनिक, टिकावू व अत्याधुनिक असे फर्निचर तसेच उत्तम सेवा बारामतीमध्ये उपलब्ध होत आहे. “मॉडर्न किचन” हा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झाला पाहिजे; असे मत उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते बारामतीमध्ये ‘मॉडर्न किचन’चे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राज्यसभा खासदार सौ. सुनेत्रा (वहिनी) पवार, फलटणचे आमदार सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री ना. पवार म्हणाले कि; मॉडर्न किचनने बेडरूम, वॉर्डरोब, ऑफिस, लिविंग एरिया यासारख्या सर्व जागांची मांडणी फार चांगल्या पद्धतीने केली आहे. ग्राहकांच्या परवडणार्या पद्धतीने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. मॉडर्न किचनचे पहिले शोरूम फलटणमध्ये सुरु झाले होते, त्यानंतर २०१९ साली पुण्यातील बाणेरमध्ये दुसरे शोरूम सुरु करण्यात आले होते व आता तिसरे शोरूम बारामतीमध्ये सुरु झाले आहे. निखिल सोडमिसे, जे फलटणचे राहणारे आहेत, त्यांनी प्रयत्न करून फलटण, पुणे व आता बारामतीमध्ये शोरूम सुरु केले आहेत.
उपमुख्यमंत्री ना. पवार यांनी सांगितले की, बारामती झपाट्याने बदलत आहे व युवकांनी विविध क्षेत्रामध्ये पुढाकार घेऊन काम करावे. निखिल सोडमिसे यांनी कॉलेज बघत बघत पुढचा विचार केला आहे व बारामती शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये फ्लॅट विकत घेतल्यावर किंवा बंगला बांधल्यावर तिथं कश्या प्रकारे फर्निचर असावे याचे अतिशय सुंदर मांडणी मॉडर्न किचनमध्ये करण्यात आली आहे. पूर्वीच्या काळामधील किचन व आताच्या काळामधील किचन यामध्ये जमीन अस्मानाचा फरक पडला आहे.
उपमुख्यमंत्री ना. पवार यांनी सांगितले की, ग्राहकांचे समाधान हेच तुमचे ध्येय असले पाहिजे. त्यामधूनच तुमचा व्यवसाय वाढणार आहे. मॉडर्न किचनच्या माध्यमातून छोट्या, छोट्या जागेचा वापर कश्या पद्धतीने करायचा असतो हे बघितल्यावर कळतो. दर्जा व सेवेच्या जोरावर “मॉडर्न किचन” हा एक विश्वासार्ह ब्रँड नक्कीच बनेल.
मॉडर्न किचनच्या उद्घाटनाने बारामतीच्या नागरिकांना आधुनिक व टिकाऊ किचन व फर्निचरचा लाभ घेता येणार आहे. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रोत्साहनाने मॉडर्न किचन संपूर्ण महाराष्ट्रात ब्रँड बनण्याच्या दिशेने पाऊले टाकेल, ही आशा व्यक्त केली जात आहे.