आधुनिक शेतीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल : कृषिमंत्री अब्दुल सत्तार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ डिसेंबर २०२२ । नाशिक । आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रायोगिक शेतीमुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडतोय, असे प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. आज नाशिक येथील डोंगरे वसतिगृह येथे आयोजित कृषी महोत्सवाच्या भेटीदरम्यान ते बोलत होते.

यावेळी कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, जिल्हा कृषी अधिकारी रमेश‍ शिंदे, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) वंदना शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, राकेश वाणी, संजय सुर्यवंशी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, शेतकरी हा आपल्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नानाविध प्रकारची पिके घेत आहे, नवीन प्रकारचे कृषी वाणांची निर्मिती सुद्धा होत आहे. या आधुनिक शेतीस निश्चितच चालना मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य भाव, माल साठवणुकीस शीतगृह, शेतीमालाचे पॅकींग, प्रक्रिया उद्योग, निर्यातीकरण या सर्वच बाबीच्या अभ्यासासाठी समिती गठित केली असून समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनस्तरावर याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.

आज कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा कृषी महोत्सवातील कृषी विभाग, वन विभाग, शेतकी कंपन्या, प्रक्रिया उद्योग, शेती माल, भाजीपाला, खते, शेती औजारे, औषधे, बी-बियाणे, खाद्य पदार्थ, शेती उत्पादने अशा विविध 200 हून अधिक स्टॉल्सला भेट देऊन त्यांनी स्टॉलधारकांशी संवाद साधला. तसेच औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड येथे आयोजित 01 ते 05 जानेवारी 2023 या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय कृषि महोत्सवास उपस्थित राहण्याचे निमंत्रण त्यांनी स्टॉलधारकांनी दिले.


Back to top button
Don`t copy text!