सातारा जिल्हयातील दोन गुन्हेगारी टोळयांवर मोक्का अंतर्गत कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १३: सातारा जिल्हयातील शिरवळ पोलीस ठाणे व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील दोन गुन्हेगारी टोळयांवर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

याबाबत माहिती अशी, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील निर्मनुष्य ठिकाणांवर लक्ष ठेवून महामार्ग व इतर जोडरस्त्यावरुन प्रवास करणारे प्रवाशी , दुचाकी स्वार व महिला प्रवाशी, जोडपे यांच्यावर लक्ष ठेवुन वाहनांचा पाठलाग करुन त्यांच्या जवळील सोन्याचांदीचे दागिने , मोबाईल हॅण्डसेट , रोख रक्कम असा ऐवज लुटून जबरी चो – या , दरोडे , खंडणी , खुनाचा प्रयत्न अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रीत करुन त्यांच्याविरुध मोक्का अंतर्गत प्रभावी कारवाई करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या.

त्या अनुषंगाने शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयातीळ आरोपी टोळी प्रमुख आरोपी क्र .१ महावीर सुखदेव खोमणे , टोळी सदस्य आरोपी क्र .२ शाहरुख महम्मुलाल बक्षी , आरोपी क्र . ३ अमीर मौलाली मुल्ला वआरोपी क्र . ४ भैय्या हुसेन शेख ५.मयुर अंकुश कारंडे वय -२० वर्ष , रा.तावशी , ता . इंदापूर , पुणे . ६.प्रदीप आबा मदने वय – १७ वर्ष ३ महिने , रा . तावशी, ता . इंदापूर, जि. पुणे ( विधीसंघर्षग्रस्त बालक ) यांच्याविरोधातील प्रस्ताव पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांनी पोलीस अधीक्षक , सातारा यांचेकडे प्रस्ताव सादर केला होता.

तसेच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयातील आरोपी टोळी प्रमुख १ ) आप्पा ऊर्फ प्रमोद ऊर्फ सुभाष ऊर्फ बंटी ऊर्फ रवि ज्ञानदेव माने रा. तामशेतवाडी ता. माळशिरस, जि. सोलापुर टोळी सदस्य २ ) पप्पु ऊर्फ सुहास किसन सोनवलकर रा. वडले ता.फलटण यांच्या बिरोधात पोलीस निरीक्षक नितीन सावंत यानी मोक्का अंतर्गत कारवाई करीता पोलीस अधीक्षक , सातारा यांचेकडे प्रस्ताव सादर केला होता .

वरील दोन्ही गुन्हयातील टोळयांचेवर मोक्का अंतर्गत कारवाईकरिता पोलीस अधीक्षक यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक , कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांचेकडे सदरचे प्रस्ताव मंजुरी कामी सादर करण्यात आले होते ,

त्यांचेवर विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर मनोज लोहिया यांनी मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मंजूरी दिली आहे. या गुन्हयांचा तपास तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण हे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!