मोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक


स्थैर्य, सातारा, दि.१८: येथील जिल्हा क्रीडा संकुलातील एका मोबाईल शॉपीमध्ये जाऊन महिला अकौंटंट तसेच इतर कामगारांना शिवीगाळ करुन दमदाटी करणाऱ्या एकास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. ही घटना शनिवार, दि. १६ रोजी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,  भूविकास बँक चौकात असणाऱ्या जिल्हा क्रीडा संकुलात मयूर प्रदीप भणगे (वय २५, रा. राजसपूरा पेठ, सातारा) यांची एस. एस. मोबाईल शॉपी आहे. शनिवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास दत्ता उत्तम घाडगे (वय २५, रा. दौलतगर, करंजे, सातारा) हा तेथे गेला. त्याने मोबाईल शॉपीमध्ये असणारी महिला अकौंटंट आणि इतर कामगारांना शिवीगाळ करत दमदाटी केली. यानंतर मयूर भणगे यांनी घाडगेच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

Back to top button
Don`t copy text!