दैनिक स्थैर्य | दि. ५ जून २०२३ | फलटण | मद्यपान करून अपघात करणार्या व शासकीय रुग्णालयाची तोडफोड करणार्या दोन्ही शासकीय अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे करण्यात आली आहे.
फलटण शहरात दोन दिवसांपूर्वी दत्तनगर परिसरात फलटण शहर पोलीस ठाण्यातून बदली झालेले पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार यांनी शनिवारी रात्री ११.०० वाजण्याच्या सुमारास मद्यपान करून वाहन चालविले व दोन बालकांना उडवून अपघात केल्याप्रकरणी या पोलीस निरीक्षकावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील व्यंकट धवन या अधिकार्यानेही दारूच्या नशेत रुग्णालयाची तोडफोड करून दहशत माजविल्याने येथील उपचार घेत असलेल्या रुग्णांना त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे या दोन्ही शासकीय अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे करण्यात आली आहे.
या अधिकार्यांवर कारवाई झाली नाही, तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांनी दिला आहे.