खा.उदयनराजेंनी केला सुरेश जगताप यांचा सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 02 : राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार एसटी महामंडळाची  बस घेवून सलग 4 हजार 600 किलोमीटरचे अंतर कापत पश्चिम बंगालमधील 22 कष्टकर्‍यांना त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचवणार्‍या बसचालक सुरेश तुकाराम जगताप यांचा नुकताच सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अमृता जगताप, अनिकेत कुलकर्णी, शेखर चव्हाण आदी उपस्थित होते. सुरेश जगताप हे सातारा आगारात चालक म्हणून कार्यरत आहेत. विना अपघात सेवा देणारे उत्कृष्ठ चालक म्हणून जगताप यांचा नावलौकिक आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाउन पुकारले आणि परराज्यातील हजारो कष्टकरी आहे त्याच जागी अडकून पडले. लॉक डाउन अंशत: शिथिल केल्यानंतर राज्य शासनाने परराज्यातील कष्टकर्‍यांसाठी बॅक टू होम अभियान सुरु केले. या अभियानाच्या केंद्रस्थानी होते एसटी महामंडळ. एसटी महामंडळाच्या बसेसच्या मदतीने परराज्यातील कष्टकर्‍यांना त्यांच्या घरी पोहोचविण्याचे काम सुरु झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणच्या आगारातील उत्कृष्ठ कर्मचार्‍यांची निवड करण्यात येवू लागली. याचनुसार सातारा आगारातील सुरेश तुकाराम जगताप यांची आणि संतोष निंबाळकर यांची निवड करण्यात आली. त्या दोघांकडे जिल्हा प्रशासनाने नोंद केलेल्या पश्चिम बंगालमधील 22 कष्टकर्‍यांना घरी सोडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.4 हजार 600 किलोमीटरचे अंतर कमी वेळेत आणि विनाजोखीम कापण्यासाठीचे नियोजन करत जगताप, निंबाळकर यांनी त्या 22 जणांना 50 तासांचा नॉनस्टॉप रस्ता कापत घरी सुरक्षित पोहचवले. जगताप, निंबाळकर यांच्या या कामाची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली. जगताप, निंबाळकर यांच्या याच कामाची दखल घेत खासदार उदयनराजे यांनी सत्काराचे आयोजन केले होते. यानुसार जगताप यांचा नुकताच सत्कार झाला. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!