दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२२ । सातारा । शाहू नगर शाहूपुरी विलासपूर यासारख्या भागांमध्ये पावसामुळे प्रचंड अस्वच्छता वाढली आहे या भागातील कचरा उचलला जात नाही त्यामुळे तत्कालीन सातारा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मर्जीतल्या ठेकेदाराला टेंडर देऊन मलिदा लाटण्याचे जे प्रकार केले त्याचाच हा परिणाम आहे अशी सडकून टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.
एका खाजगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी हद्द वाढीच्या क्षेत्रामध्ये सातारा नगरपालिकेचे कसे दुर्लक्ष होत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले ते पुढे म्हणाले की गणपतीच्या काळामध्ये प्रचंड पाऊस होता त्यामुळे रस्त्याची साईड पॅचिंग करण्यात आले नव्हते मात्र आता पाऊस थांबला आहे रस्त्यांची कामे तत्काळ करून घ्यावीत .शाहूपुरी शाहूनगर विलासपूर येथे पावसामुळे प्रचंड गवत वाढले असून ठिकठिकाणी सार्वजनिक कचरा सुद्धा वाढला आहे घंटागाडी कुठे कुठे वेळेवर येत नसल्यामुळे कचरा संकलनाची अडचण होत आहे नागरिकांनी नगरपालिकेत तक्रारी केल्या तरी त्याची दखल घेतली जात नाही.
याला सर्वस्वी कारण मध्ये सातारा विकास आघाडीचे स्वच्छतेविषयीचे धोरण कारणीभूत आहे मर्जीतल्या ठेकेदाराला हट्टाने ठेका गेला पाहिजे आणि त्याच्याकडून त्या ठेक्याचे कमिशन मिळाले पाहिजे या हट्टापोटीच हा ठेका जाणीवपूर्वक लांबवण्यात आला त्याचेच परिणाम साताराला भोगावे लागत असून नागरिकांच्या जीवाशी हा एक प्रकारचा खेळ सुरू असल्याची कडवट टीका शिवेंद्रसिंह राजे यांनी केली सध्या पालिकेत प्रशासक अभिजीत बापट यांचे प्रशासन आहे त्यामुळे त्यांनी या प्रश्नांमध्ये तातडीने लक्ष घालून हद्दवाढीतल्या भागाची स्वच्छता आणि तेथील आरोग्य सुविधा याकडे लक्ष द्यावे अशी सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.