फलटणच्या महानुभाव पंथाच्या पवित्र स्थळासाठी आमदार सचिन पाटील यांची सेवा भावना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 28 डिसेंबर 2024 | फलटण | महानुभाव पंथीयांसाठी फलटण हे स्थान दक्षिण काशीच्या रूपाने भारतभर व जगभर ओळखले जाते. या पवित्र स्थळाचे महत्व लक्षात घेता, आमदार सचिन पाटील यांनी महानुभाव पंथीयांसाठी आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्याची विशेष संधी मिळेल तेव्हा ती स्वीकारून सेवा करण्याचे आश्वासन दिले आहे. हे आश्वासन त्यांनी दि. 27 डिसेंबर रोजी श्री चक्रपाणी महानुभाव मठाचे संचालक महंत श्री मुकुंदराज बाबाजी यांच्या उपस्थितीत दिले.

मार्गशीर्ष मासाच्या पूर्वसंध्येला श्रीचक्रपाणी जन्मस्थान मंदिरात परमार्ग सेवक तावडे परिवाराच्या वतीने श्रीपंचावतार उपहार विधी, विडावसर व महाआरती महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या मंगलमय सोहळ्यासाठी उपाध्य कुळाचार्य श्री बिडकर बाबाजी, महंत श्री राहेरकर बाबाजी, महंत श्री कापूसतळणीकर बाबाजी व फलटण येथील निवासी संत महंतांची उपस्थिती लाभली.

यावेळी फलटण नगरपालिकाचे माजी नगरसेवक अनुप शहा, सचिन आहिवळे अनेक मान्यवर व शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य महंत श्री श्यामसुंदर जामोदेकर यांच्यासह सेवा समर्पण गृप चे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार महंत श्री गोपाळव्यास बाबा व महंत श्री विरागव्यास बाबा यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!