
दैनिक स्थैर्य | दि. 02 एप्रिल 2025 | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन सुधाकर पाटील यांचा आज वाढदिवस विविध उपक्रम राबवत फलटण येथे संपन्न होणार आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार सचिन पाटील हे त्यांच्या फलटण येथील लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानाच्या समोर असणाऱ्या जुन्या माई बझार अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फलटण कार्यालयात शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
यावेळी आमदार सचिन सुधाकर पाटील यांना शुभेच्छा देताना हार, बुके पेक्षा वही किंवा पेन आणावेत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फलटण शहराध्यक्ष राहुल निंबाळकर यांनी केले आहे.
आमदार सचिन पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे सुद्धा आवाहन शहराध्यक्ष राहुल निंबाळकर यांनी केले आहे.