
दैनिक स्थैर्य | दि. 08 एप्रिल 2025 | फलटण | श्री शिखर शिंगणापूर येथे असणाऱ्या मुख्य यात्रेच्या निमित्ताने फलटण येथून विविध कावडी ह्या मार्गस्थ होत असतात. त्यामधील प्रमुख असणाऱ्या मानाच्या तेल्या भुत्या कावडीचे स्वागत हे फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी जनतेच्या वतीने स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.
यासोबतच कावडीच्या मार्गात जर कोणतेही अडीअडचण आली तर त्याला नक्की आपण स्वतः मार्ग काढू, असे मत सुद्धा यावेळी आमदार सचिन पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.