आमदार सचिन पाटील यांनी घेतला फलटण तालुक्यातील पाणीपुरवठा विभागाचा आढावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० जानेवारी २०२५ | फलटण |
आमदार सचिन पाटील यांनी रेस्ट हाऊस येथे पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. फलटण तालुक्याचे प्रभारी गटविकास अधिकारी सतीश कुंभार, दारासिंग निकाळजे विस्तारित गटशिक्षणाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.

बैठकीस भाजपाचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, गटनेते अशोकराव जाधव, अमित रणवरे, अमोल खराडे उपस्थित होते.

फलटण तालुक्यामध्ये जानेवारी ते एप्रिल महिन्यात पाणीपुरवठा कुठेही कमी पडू नये. तालुक्यामध्ये एकही गावाला पाणी कमी पडणार नाही. पिण्याचे पाणी, जनावरांना पाणी हे मुबलक मिळाले पाहिजे याची काळजी घ्यावी, अशा सूचना आमदार सचिन पाटील यांनी यावेळी दिल्या.

यावेळी तालुयातील पाणीपुरवठा, जलसंधारण, पाणंद रस्ते, पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या सर्व योजनांची माहिती आमदारांनी घेतली. याबाबत तालुक्यातील ग्रामसेवक, सरपंच व जिल्हा परिषद शिक्षक यांची लवकरच बैठक घेऊन गावातील जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी सतीश कुंभार यांनी सर्व माहिती दिली. या तालुक्यातील जनतेची कामे करण्यासाठी प्रशासन सहकार्य करेल, असे त्यांनी आश्वासन दिले.

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)

Back to top button
Don`t copy text!