
दैनिक स्थैर्य । 11 एप्रिल 2025 । फलटण । फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी आज फलटण येथील महात्मा फुले चौक येथे असणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन केले.
या ठिकाणी जयंती उत्सव समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढण्याचा सुद्धा मोह हा आमदार सचिन पाटील यांना आवरला नाही त्यांनी त्या ठिकाणी सेल्फी सुद्धा काढला.
यावेळी जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सायकल स्पर्धेच्या स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरण सुद्धा आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.