आमदार सचिन पाटलांच्या कडून ओरिजनल सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे फलटणमध्ये दर्शन व मनोभावे प्रार्थना


दैनिक स्थैर्य | दि. 04 एप्रिल 2025 | फलटण | येथे आलेल्या अद्भुत योगामध्ये एक असलेला म्हणजे सर्वसामान्य फलटण कर नागरिकांसाठी ओरिजनल सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन होय. फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेच्या वतीने आमदार सचिन पाटील यांनी मनोभावे दर्शन घेतले व मतदारसंघात असणाऱ्या नागरिकांवर कोणत्याही अडीअडचणी येवू नयेत, अशी प्रार्थना सुद्धा आमदार सचिन पाटील यांनी यावेळी केली.

फलटण येथे टीओके हॉलमध्ये ओरिजनल सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शनाचे आयोजन आर्ट ऑफ लिविंग च्या वतीने करण्यात आले होते. यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन सुधाकर पाटील यांनी सदरील ज्योतिर्लिंगाचे मनोभावे दर्शन घेतले व जनतेसाठी प्रार्थना केली.

फलटणकर जनतेसाठी अद्भुत असा योग साधून आला असल्याचे मत सुद्धा व्यक्त करीत असताना आमदार सचिन पाटील म्हणाले की, सर्वसामान्य फलटणच्या जनतेने सदरील सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे मनोभावे दर्शन घेणे गरजेचे आहे. या ठिकाणी आल्यानंतर आध्यात्मिक ऊर्जा मिळाल्याचे मत सुद्धा यावेळी त्यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!