
दैनिक स्थैर्य । 26 मे 2025। फलटण । गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीन विस्कळीत झाले होते. पावसाचे पाणी कोळकी येथील रहिवाशांच्या घरामध्ये गेले. त्यामुळे नागरिकांचे खूप नुकसान झाले आहे.
आमदार सचिन पाटील यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. येथील गणेश मोरे यांच्या घरी आ. सचिन शिंदे यांनी भेट दिली. प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचा दिलासा दिला. ज्याचे नुकसान झाले आहे. त्यांचे तातडीने पंचनामे करून तातडीने मदत करण्याचे सुचना दिल्या.
यावेळी जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे , युवा नेते संजय देशमुख, सचिन रणवरे, उदयसिंह निंबाळकर, माऊली शिंदे, गणेश मोरे, बाळासाहेब काशिद, संदिप नेवसे रणजीत जाधव, विकास माळे सागर चव्हाण , संदिप कांबळे , ग्रामसेवक साळुंखे यांनी नागरिकांना तातडीने मदत केली. जेसीबीने घराबाहेर पाणी बाहेर काढले. तसेच कोळकीतील महायुतीचे पदाधिकार्यांनी मदत करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.