दैनिक स्थैर्य | दि. १९ डिसेंबर २०२४ | नागपूर | फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचा नक्की कोणत्या प्रकारे फायदा करून देता येईल ? यासाठी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील हे अधिवेशन काळात सुद्धा शांत न बसता शेतकऱ्यांचा फायद्यासाठी नागपूर येथे असणाऱ्या “अंकुर सीड्स” या प्रकल्पाला त्यांनी सदिच्छा भेट दिली आहे. अंकुर शुभेच्छा माध्यमातून आगामी काळामध्ये फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध योजना ह्या फलटण तालुक्यात राबवल्या जाणार असल्याची ग्वाही सुद्धा यावेळी देण्यात आली आहे.
देशाच्या शेतकऱ्यांच्या मनावर ठसा उमटविला असणाऱ्या “अंकुर सिडस” या कंपनीच्या सुमारे दीडशे एकरातील, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळेला भेट दिली. प्रयोग शाळेतील रोबोटीक बिजरोपन व निरोगी बियाणे, व्हाइरस प्रतिबंध, रोगप्रतिरोधक बिज उत्यादन, पिक प्रात्यक्षिक प्लाॅट, उत्यादन माहीती, शेतकरी उपयोगी उत्यादन माहीती घेवुन फलटण तालुक्यातील शेतकर्यांसाठी अंकुर सिडसच्या मार्फत काय फायदा होवु शकतो.
या वेळी कापूस, तूर, घेवडा, टोमॅटो, भेंडी, मिरची या विविध पिकांच्या प्लाँटला भेट देऊन पिंकाच्या रोगप्रतिबंध उत्पादन अशा विविध विषयांवर आमदार सचिन पाटील यांनी चर्चा केली.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नागपुर येथील मित्र व “अंकुर सिडस्” चे मालक वैभव काशीकर यांनी विविध विषयांवर माहीती दिली.
यावेळी आमदार सचीन पाटील यांच्या समवेत विजय कदम, शिवसेना फलटण तालुकाप्रमुख नानासो इवरे, गोखळीचे तंटामुक्ती अध्यक्ष मनोज गावडे, विशाल माने, अमोल पवार, कटनी जिल्हा भाजप कोषाद्यक्ष CA अर्पित आग्रवाल यांची उपस्थिती होती.