विधिमंडळाच्या अल्पसंख्यांक कल्याण समितीच्या सदस्यपदी आमदार सचिन पाटील यांची नियुक्ती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 27 मार्च 2025 | फलटण | महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्यांचे गठन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या नंतर सरकारच्या वतीने करण्यात आले. यामध्ये अल्पसंख्यांक कल्याण समितीच्या सदस्य पदी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन सुधाकर पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

विधिमंडळाचे कामकाज यशस्वीरित्या चालवण्यासाठी विधिमंडळामध्ये विविध समित्या कार्यरत असतात. त्यामधील अल्पसंख्यांक कल्याण समितीच्या सदस्य पदी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन सुधाकर पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

यामध्ये आमदार मुरजी पटेल हे समिती प्रमुख असणार आहेत. तर आमदार नरेंद्र मेहता, आमदार महेश बालदी, आमदार मिहीर कोटेचा, आमदार राजन नाईक, आमदार कुमार आयलानी, आमदार अब्दुल सत्तार, आमदार सना मलिक, आमदार सचिन पाटील, आमदार हारून खान, आमदार साजिद पठाण हे असणार आहेत, तर निमंत्रित सदस्य म्हणून आमदार मुक्ती खालिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसस्कर, सातारा जिल्हा बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, स्वराज्य पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांनी आमदार सचिन पाटील यांचे अल्पसंख्यांक कल्याण समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!