
दैनिक स्थैर्य | दि. 18 एप्रिल 2025 | फलटण | महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेली फलटण नगरी येथे आज घोड्याच्या यात्रेच्या निमित्ताने आमदार सचिन सुधाकर पाटील व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते घोड्याच्या यात्रेचा पालखी पूजन व स्थान पूजन करून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आबासाहेब देवस्थान मंदिर समितीचे ट्रस्टी व मान्यवरांचे हस्ते आमदार सचिन पाटील व ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे.