फलटण तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीत आमदार श्रीमंत रामराजे व आमदार दीपक चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑगस्ट २०२४ | फलटण |
महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी फलटण तालुक्यातील एकात्मिक विकासासाठी तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती स्थापन केली आहे. या समितीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

फलटण तालुक्याची समिती पुढीलप्रमाणे :
१) अध्यक्ष – आमदार दीपक चव्हाण
२) सदस्य – आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळक
३) सदस्य – फलटण पंचायत समितीचे अध्यक्ष/सभापती
४) सदस्य – फलटण तहसील विभागातील खरेदी विक्री संस्थेचे/संस्थांचे अध्यक्ष
५) सदस्य सचिव – तहसीलदार/ प्रभारी तहसीलदार
६) सदस्य – महादेव दगडू बड़े
७) सदस्य – सचिन लालासो फडतरे
८) सदस्य – राजकुमार मारुती बाबर (अनु. जाती)
९) सदस्या – सारिका दत्तात्रय कदम
१०) सदस्या – नंदिनी विठठल गायकवाड


Back to top button
Don`t copy text!