आमदार मकरंद पाटील यांनी घेतली खासदार उदयनराजेंची भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.९ मे २०२२ । सातारा । किसन वीर सातारा साखर कारखाना निवडणूक जिंकल्यावर आमदार मकरंद पाटील यांनी आपले पूर्वाश्रमीचे मित्र खासदार उदयनराजे भोसले यांची निवासस्थानी भेट घेतली.यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

किसन वीर सातारा कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या किसन वीर बचाव शेतकरी पॅनेलने संचालक मंडळाच्या सर्व जागा मोठ्या मताधिक्याने जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले.या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांची भूमिका महत्त्वाची ठरली. या यशानंतर आमदार पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे यांनी आपले मित्र आमदार मकरंद पाटील यांना मिटी मारून स्वागत केलं. यावेळी त्यांचे अभिनंदन करून सातारी कंदी पेढा भरवून आपल्या मित्राचे कौतुक केले.

यावेळी खासदार उदयनराजेंनी म्हणाले की, तुमच्याकडे आता तीन कारखाने, जिल्हा बँक आणि आमदारकी तुम्ही जिल्ह्याचे बॉसच की… असे म्हणत किसन वीर कारखान्याच्या निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मकरंद पाटील यांना खासदार उदयनराजे भोसले यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी मोठी मदत केल्याचे बोलले जात आहे. यामुळेच मकरंद पाटील हे अचानक जलमंदीर या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी उदयनराजे यांचे आभार मानले आहेत, अशी चर्चा दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे. या‌ भेटीदरम्यान अर्ध्या तासात नक्की काय चर्चा झाली या बाबत मात्र गूढ कायम‌ आहे.

आमदार मकरंद पाटील हे अनेक वर्षानंतर प्रथमच जलमंदीर या ठिकाणी गेल्याचे पहायला मिळाले . यामुळेच आता साताऱ्यात राजकीय राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

आज रविवार दि ८ मे रोजी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त येणार आहेत. दुपारी रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे आहे यानंतर साताऱ्यात शरद पवारांना कोण कोण भेटते मी काय चर्चा होते हे हे महत्त्वाचे ठरणार आहे.या पार्श्वभूमीवर उदयनराजे आणि मकरंद पाटील या दोघांची झालेली भेट महत्वाची मानली जात आहे. साताऱ्याच्या दौऱ्यात शरद पवार आणि अजित पवार नक्की काय बोलणार आणि काय निर्णय घेतले जाणार याबाबत जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागून राहिल‌े आहे.


Back to top button
Don`t copy text!